अमळनेर पोलीस स्टेशनला चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील खवशी येथून ८ हजार रुपये किमतीच्या विद्युत महामंडळाच्या ९०० मिटर अल्युमिनियम तारांची चोरी झाल्याची घटना २६ रोजी उघडकीस आली असून अज्ञाताविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा.अभियंता प्रदीपकुमार परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,तालुक्यातील खवशी येथील शिवारात नेमणुकीस असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ दिनेश पाटील यांना २६ रोजी गट क्रमांक २८९ व २९० मधील विद्युत खांबावरील ९०० मीटर अल्युमिनियम वायर आढळून आली नाही.८ हजार रुपये किमतीच्या अल्युमिनियम वायर चोरीविरोधात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. संदेश पाटील करत आहेत.