मारवड पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील भिलाली येथील पांझरा नदीतून विहिरीवरील ७ हजार रुपये किमतीची ५० ते ५५ फूट केबल चोरीस गेल्याची घटना २७ रोजी घडली.
दयाराम माधवराव पाटील (रा एकलहरे) यांच्या शेतीसाठी भिलाली येथे पांझरा नदीत विहीर खोदली असून २७ रोजी तेथील विहिरीजवळची मोटारीची ७ हजार रुपये किमतीची ५० ते ५५ फूट केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. मारवड पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत.
Related Stories
December 22, 2024