शाळा-आपल्या दारी या उपक्रमांतर्गत घरी जात गुणवंतांना भरविला पेढा…
अमळनेर -येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या वर्गाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या पार्श्वभूमीवर “शाळा- आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा आई- वडिलांसह घरी जाऊन सन्मान केला. गुणवंतांना पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. ग्रामीण भागात अनोख्या पध्द्तीने झालेल्या या सन्मानाने पालक- विद्यार्थी सुखावले आहेत. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थिनी या “शेतकरी कन्या” आहेत.
येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दिव्या किरण पाटील (रा.सडावण) हिने 92.40 टक्के गुण मिळवून प्रथम, डिंपल समाधान पाटील (रा.सुंदरपट्टी )हिने 91.20 टक्के गुण मिळवून द्वितीय, प्राची दत्तात्रय पाटील (रा.सुंदरपट्टी) हिने 90.60 टक्के गुण मिळवून तृतीय तर कनिष्का देवानंद पाटील (रा.सडावण) हिने 89.20 टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक तर वैष्णवी विनोद पाटील (रा.सुंदरपट्टी )हिने 88.40 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गुणवंत विद्यार्थिनींसह खुशी पाटील, अश्विनी पाटील, भाग्यश्री पाटील, तनुजा पाटील यांचाही जेष्ठ शिक्षिका कल्पना महंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे शिक्षक उमेश काटे, जी पी हडपे, आर आर पाटील, डी. व्ही.पाटील यांच्या सह पालक किरण पाटील, समाधान पाटील, दत्तात्रय पाटील, देवानंद पाटील, विनोद पाटील आदी उपस्थित होते. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान दहावी परीक्षेला प्रविष्ट असलेल्या 34 पैकी 19 विद्यार्थिनीं ह्या विशेष प्राविण्यासह तर 14 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शिला पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्राचार्य गायत्री भदाणे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.