
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- मठगव्हाण येथील मठगव्हाण नालखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत सन 2021-2022 या वर्षाचे मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांकडून शाळेच्या परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमेश्वर गांगुर्डे,सदस्य योगेश पवार,शिक्षणतज्ञ प्रशांत शिरसाठ,प्रविण वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले.







