
अमळनेर:- भारत सरकारकडे नोंदणीकृत माणुसकी सोशल फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कार’ डॉ.भूषण देशमुख यांना जाहीर झाला आहे.
निवड समितीने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, कोरोनाच्या काळात समाजासाठी केलेल्या अतुलनीय वैद्यकीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. दि 26 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ भुषण देशमुख हे अमळनेर येथिल रहिवाशी असुन ते सेवानिवृत्त प्रा.प्रवीण देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा सरचिटणीस प्रा.रंजना देशमुख यांचे सुपुत्र आहेत. ते आठवड्यातुन एक दिवस मातृभूमीसाठी दुर्गा हॉस्पिटलमध्ये सेवा देतात त्यांना मिळणाऱ्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.







