अन्यथा करणार तीव्र आंदोलन, निवेदनाव्दारे तरुणांनी दिला इशारा…
अमळनेर:- शहरातून जाणाऱ्या राज्य मार्ग १५ वर असणारे अपघाताला आमंत्रण देणारे दोन धोकेदायक चेंबर्स तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी समाजसेवकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराणा प्रताप चौकात व पाचपावली देवी चौकात धुळे चोपडा राज्यमार्गावर असलेल्या चेंबर्सच्या जाळ्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे वाहने अडकून अथवा पडून अपघात होत आहेत. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांची आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला सांगून लोखंडी जाळ्या दुरुस्त करून घ्याव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल व याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल lअसा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन परदेशी, राहुल अहिरे , कुणाल भावसार, भरत जाधव, राहुल कंजर, चेतन पाटील, भावेश साळुंखे, सागर विसपुते, भावेश जैन, अंकित देशमुख, निलेश राजपूत, राज लाड, मनोज शिंगाणे, योगेंद्र बाविस्कर, तुषार सोनार,नावेद शेख , लालचंद सैनानी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे.