पिळोदा येथील घटना, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- पुतण्या व दिर दिराणीने महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पिळोदा येथे १ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली.
पिळोदा येथील रामा देवसिंग सोनवणे हा आपला मुलगा व सून यांच्यासह मालेगाव येथे लग्नाला निघून गेल्यानंतर त्याची पत्नी १ जून रोजी दुपारी बारा वाजता मोरी मध्ये कपडे भांडे धुत असताना तिचा पुतण्या भगवान विलास सोनवणे अचानक आला आणि त्याने कमरेवर लाथ मारल्याने ती महिला पुढे भांड्यांवर पडली. पुन्हा त्याने गचांडी पकडली. त्यावेळी महिलेने जोरात आवाज दिल्यावर दुसरे दिर व पुतण्या यांनी सुटका केली. पुनः थोड्या वेळाने भगवान तसेच दिर विलास देवसिंग सोनवणे,दिराणी सुनंदाबाई हे तिच्या घरी आले आणि घरात घुसून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दिराणी सुनन्दाबाई हिने केस ओढून तिचे डोके कुलरवर आपटले. त्यांच्या तावडीतून जेमतेम सुटका केल्यावर उपचारासाठी दवाखान्यात गेली. उपचार करून उशिराने आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.