अमळनेर पोलिसांत दोन्ही भाच्यांविरुद्ध मामाने दिली फिर्याद…
अमळनेर:- वहिवाटीच्या कारणावरून भाच्यानी मामाला मारून त्याचा हात फ्रॅक्चर केल्याची घटना २ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास शांतीनगर भिलाटी भागात घडली.
मणीलाल मोतीलाल चव्हाण याच्या शेजारीच त्याची बहीण व भाचे राहतात. वहिवाटी वरून त्यांचे वाद असल्याने भाचे त्याला नेहमी शिविगाळ करीत असतात. २ रोजी रात्री मणीलाल घरी असताना त्याला आरडाओरड करण्याचा आवाज आला म्हणून तो बाहेर ओट्यावर आला असता त्याचा मोठा भाचा विशाल दिनेश मालचे हा त्याला शिवीगाळ करू लागला. आणि लगेच येऊन चापट बुक्क्यांनी मारू लागला. तेव्हढ्यात लहान भाचा महेश दिनेश मालचे पळत आला आणि त्याने जोरात कमरेवर लाथ मारल्याने मणीलाल ओट्यावरून खाली पडला. त्याचा हाथ फ्रॅक्चर झाला. मणीलालच्या पत्नीने याबाबत जाब विचारला असता जर तक्रार केली तर तुला यापेक्षा जास्त मारू आणि हातपाय तोडून टाकू अशी धमकी दिली. मणीलाल उपचारासाठी दवाखान्यात गेला व बरे वाटल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून उशिरा दोघा भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.