अमळनेर:- नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्याकडून महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा परीक्षा 2023 चे आयोजन ऑक्टो. 2023 मध्ये करण्यात आले होते. त्यानुसार नगरपरिषद राज्य सेवेतील विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आलेली होती.
सदर परीक्षेमध्ये नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी २५% आरक्षण दिलेले होते. त्यात अमळनेर नगर परिषदेमधील वरिष्ठ औषध निर्माता महेश जोशी यांनी पूर्ण महाराष्ट्रातून २९वी रँक प्राप्त करून कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदासाठी त्यांची निवड झाली. त्यांनी नगरपरिषदेतील काम सांभाळून परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल मुख्याधिकारी तुषार नेरकर, माजी विरोधी पक्षनेते नगरपरिषद प्रवीण पाठक, उपमुख्याधिकारी, नगर अभियंता, नगररचनाकार तसेच नगरपरिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.