अमळनेर:- तालुक्यातील जवखेडा येथे पत्र्याच्या कुलरचा शॉक लागून ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ९ रोजी घडली आहे.
जवखेडे येथील दिनेश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गं.भा. योगिता सुनील गोसावी (वय ४२) याच्या घरातून ओरडण्याचा आवाज आल्याने तिथे जावून पाहिले असता योगिता ह्या पत्र्याच्या कुलरचा शॉक लागून खाली पडलेल्या दिसल्या. स्विच बंद करून वायर काढून योगिता गोसावी यांना बाजूला केले मात्र त्या कोणतीच हालचाल करत नसल्याने त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील करीत आहेत.