अमळनेर : वाघोद्याहून लोंढवे मार्गे अमळनेर येणाऱ्या एस टी बस आणि समोरून येणाऱ्या मोटरसायकलची धडक झाल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना २५ रोजी सायंकाळी घडली.
अमळनेर आगराची एस टी क्रमांक एम एच २० बी एल ३३६५ ही वाघोद्याहून लोंढवे मार्गे अमळनेरकडे निघाली असता लोंढाव्याकडून विकास सुखदेव पाटील व अनिल सुखदेव पाटील हे मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी पी ६५२१ वर गावाकडे परतत असताना गावाच्या बाहेरच एस टी व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. त्यात दोघे रस्त्यावर फेकले जाऊन दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागेवर बेशुद्ध पडले. बाळासाहेब पाटील ,प्रमोद बहिरम ,एम जे पाटील यांच्यासह चालक सचिन पाटील , वाहक रवींद्र वानखेडे रुग्णवाहिका बोलावून त्यांना तातडीने अमळनेर येथे नर्मदा फौंडेशनला दाखल करण्यात आले. डॉ अनिल शिंदे यांनी त्यांच्यावर उपचार करून अतिदक्षता विभागात ठेवले आहे.
हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , सागर साळुंखे , गणेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.