अमळनेर पोलिसांत पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- मोटरसायकल अडवून पाचही जणांनी तिघांना लोखंडी सळई, लाकडी फळ्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना १५ रोजी सायंकाळी ५ वाजता गांधलीपुऱ्यात घडली.
हर्षलसिंग नरेंद्रसिंग ठाकुर (रा रेल्वे स्टेशनजवळ) हा आपला मित्र राजेश खरारे याला घेऊन मोबाईल दुरुस्तीसाठी धुळ्याला गेला होता. अमळनेर आल्यावर त्यांना त्यांचा मित्र दुर्गेश सोनवणे भेटला. पाऊस चालू असल्याने त्याने दोघांना घरी सोडण्याची विनंती केली. म्हणून ट्रीपलसीट त्याला घेऊन गांधलीपुरा भागात त्याच्या घरी गेले असता गरीब नवाब चौकात सलमान खान रफा, आकीबअली सैय्यद, सोहिल शेख सोडेवाला, नवाज खाटीक,एजाज पठाण यांनी मोटरसायकल थांबवून राजेश खरारे व दुर्गेश सोनवणे याना मागे ओढून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करू लागले. त्यावेळी दुर्गेश तेथून पळून गेला. राजेशला मारहाण करीत असताना हर्षल मोटरसायकल काढून पुढे जाऊ लागला तेव्हा सलमान रफा याने हातातील विट व लोखंडी सळई मारून मोटरसायकलवरून खाली पाडले. तुम्ही मारहाण का करीत आहेत असा जाब समोरच्यांना विचारले असता त्यांनी तुमचा मित्र राजेश खरारे हा जास्तच हिंदुत्व दाखवून जास्तच रील करतो असे सांगत लाथा बुक्क्यांनी मारून अश्लील शिवीगाळ करू लागले. सलमानच्या हातात लोखंडी सळई, आकीब याच्या हातात लाकडी फळी, सोहेल व नवाज यांच्या हातात लाकडी काठ्या आणि एजाज याच्या हातात लोखंडी सळई होती. हर्षलच्या तोंडावर व पायावर मारून जखमी केले. यावेळी राजेशची आई रजनी खरारे व बहीण लक्ष्मी खरारे भांडण आवरायला आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. या भांडणात हर्षल याचे २० हजार रुपये पडून नुकसान झाले. अमळनेर पोलीस स्टेशनला पाचही आरोपींविरुद्ध रस्ता अडवणे,मारहाण, अश्लील शिवीगाळ व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे,गणेश पाटील यांनी १६ रोजी पहाटे सर्व पाचही आरोपींना अटक केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत. दरम्यान हर्षल ठाकूर व राजेश खरारे हे गांधलीपुरा भागात जाऊन मोबाईलमध्ये शूटिंग करीत असल्याची तक्रार एका महिलेने केली असल्याचे समजते.