अमळनेर:- न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून बाहेर येणाऱ्या सासूला जावयाकडून मारहाण झाल्याची घटना घडली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील मीराबाई राजेंद्र कुटुंबळे यांची मुलगी माधुरी हिचे लग्न अमळनेर येथील पिंपळे रोड क्रांती नगर भागात राहणारे चंदन भोळे यांच्याशी २०११ मध्ये झाले. मात्र कौटुंबिक वाद निर्माण झाल्याने मागील दोन वर्षांपासून मुलगी माहेरी राहत आहे.
१८ रोजी मीराबाई कुटुंबळे या त्यांचे पती राजेंद्र कुटुंबळे, मुलगा हृषीकेश कुटुंबळे यांच्यासह अमळनेर न्यायालयात असलेल्या एका गुन्ह्याबाबतीत अटक वॉरंट रद्द करण्यासाठी सकाळी ११ वाजता न्यायालयात आले होते.दुपारी ३ वाजता त्याचे अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केल्याने ते न्यायालयाच्या बाहेर पडत असतांना त्यांचे जावई चंदन भोळे तिथे आले.आमच्या विरोधात असलेली ४९८ ची केस मागे घ्या असे चंदन भोळे याने सासूला सांगितले.
यावेळी चंदन भोळे यांनी सासूचा उजवा हात धरून,साडी ओढून चापटाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली यावेळी त्याचा शालक हृषीकेश कुटुंबळे हा मध्ये आला असता त्याला पण मारहाण केली तसेच तुला व तुझ्या कुटुंबाला मारून टाकेल अशी धमकी दिल्याप्रकरणी चंदन भोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे करत आहेत.