अमळनेर:- तालुक्यातील शिरुड येथे 18 जून रोजी अमळनेर कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी पंधरवाड्यानिमीत्त महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी सहाय्यक सुप्रिया पाटील यांनी शासनाच्या एम.आर जी. एस.योजनेअंतर्गत बांधावर फळबाग लागवड, वूक्ष लागवड योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून सध्या सेंद्रिय शेती काळाची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजीपाला बियाणे आणि तुरीचे बियाणे ही वाटप करण्यात आले.तसेच कृषी सहाय्यक भूषण पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गावातील महिला शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.