मुख्याधिकारीनी दिली उपाय योजनेची ग्वाही
अमळनेर– शहरात झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्स मधील भिंत अचानक पडून संपुर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना सोबत घेऊन पाहणी केली.
पालिकेची गटार चोकअप झाल्याने हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्याने मंत्री पाटील यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना सूचना करत तातडीने ही समस्या सोडविण्याचे सूचित केले. श्री नेरकर यांनी देखील तातडीने काम करण्याची ग्वाही दिली., तसेच मंत्री पाटील यांनी ज्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले त्यांनाही धीर देत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.यावेळी राष्ट्रवादी चे तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यासह नागरिक व व्यापारी बांधव उपस्थित होते.