अमळनेर ते पंढरपूर सुमारे 575 किलोमीटर पायीवारीचे 24 दिवसाचे नियोजन…
अमळनेर:- सुमारे 239 वर्षाची सुरू असलेली परंपरा संतश्री सखाराम महाराज संस्थानतर्फे अमळनेर ते पंढरपूर पायी वारी यावर्षीही संत श्री प्रसाद महाराजांच्या नेतृत्वात २३ जून ते १५ जुलै दरम्यान काढण्यात येणार आहे. अमळनेर ते पंढरपूर सुमारे ५७५ पायी वारीचे २४ दिवसाचे नियोजन संस्थांतर्फे केले गेले आहे. सन १७८५ पासून ही वारी सुरू आहे.
या पायी वारीला जाणाऱ्या भाविकांची दोन दिवस अगोदर वाडी संस्थांतर्फे नोंदणी केली. या वारीला सुमारे 239 वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी अमळनेरहुन दोनशेपेक्षाही अधिक वारकरी वारीत सहभागी होतात. पुढे ही वारकऱ्यांची संख्या पहिल्या ठिकाणाहून वाढत वाढत जाऊन करमाळापर्यंत 700 ते 800 पर्यंत होते. अमळनेर ते पंढरपूर पायी वारी साधारणतः रोज पायी वारी ही 25 ते 30 किलोमीटर चालत असते. अमळनेरहुन पायी वारी 23 जून रोजी सकाळी पाच वाजता संत श्री प्रसाद महाराज यांचे प्रस्थानाचे भजन होऊन नंतर महाराज पांडुरंगाचा निरोप घेऊन साडेसहा वाजता वाडी मंदिर सोडून महाराज पैलाड भागातील तुळशीबागेत पोहोचतात. त्यानंतर महाराजांचा सकाळचा पूजापाठ आणि तुळशीपत्र तुळशी बागेत होते त्यानंतर महाराज भाविकांना दर्शनासाठी आसनावर बसतात हजारो भाविक तुळशीबागेत दर्शनासाठी उपस्थित असतात
बारा वाजता महाराज वाडी संस्थांचे मानाचे विश्वस्त देशमुख हे फुलांचा आहार महाराजांच्या गळ्यात टाकून सत्कार करतात त्यानंतर वाडी संस्थानाचे पुजारी महाराजांच्या डोक्यावर घोंगडी टाकतात व गळ्यात विना आणि हातात चिपळ्या देऊन पांडुरंगाच्या नामस्मरणाने दिंडी पंढरपूर कडे प्रस्थान करते. त्याचबरोबर पायी वारीत महाराजांसोबत पांडुरंगाची मूर्ती तसेच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, आणि नाथ भागवत असे तीन ग्रंथ महाराजांसोबत असतात. मग दिंडी सडावणमार्गे संध्याकाळी पारोळा येथे मुक्कामी पोहोचते. २४ रोजी सकाळी पारोळाहून संध्याकाळी आडगाव पोहोचेल. २५ रोजी भडगावला संपूर्ण दिवस वारी थांबेल. २६ रोजी भडगावहून संध्याकाळी नगरदेवळा पोहोचेल. २७ रोजी नेरीला संपूर्ण दिवस थांबणार आहेत. २८ रोजी सकाळी नागदहून संध्याकाळी बिलखेडा येथे पोहोचेल. २९ रोजी वारी नागापूरला संपूर्ण दिवस थांबेल. ३० रोजी सकाळीनागापूरहून संध्याकाळी पिशोर येथे पोहोचेल. १ जुलै रोजी सकाळी पिशोरहून संध्याकाळी चिकालठाणा येथे पोहोचेल. २ रोजी सकाळी चिकालठाणाहून संध्याकाळी टाकळी येथे पोहोचेल. ३ रोजी सकाळी टाकळीहून
संध्याकाळी दौलताबादला पोहोचेल. ४ रोजी सकाळी (रांजणगाव शे.पु.) वाळुजहून संध्याकाळी म्हारोळा येते पोहोचेल. ५ रोजी सकाळी बिडकिन / ढोरकिनहून पैठण येथे पोहोचेल. ६ रोजी सकाळी पैठणहून संध्याकाळी शेवगावला पोहोचेल. ७ रोजी सकाळी चितळीहून संध्याकाळी पाथर्डी येथे पोहोचेल. ८ रोजी सकाळी माणिकदवंडीहून संध्याकाळी धामणगाव येथे पोहोचेल. ९ रोजी संध्याकाळी आष्टी येथे पोहोचेल. १० रोजी आष्टी / डोणगावहून संध्याकाळी अरणगावला पोहोचेल. ११ रोजी सकाळी फक्राबादहून संध्याकाळी नानज येथे पोहोचेल. १२ रोजी सकाळी जवळाहून संध्याकाळी करमाळा येथे पोहोचेल. १३ रोजी सकाळी निंभोरेहून संध्याकाळी वडशिवणे येथे पोहोचेल. १४ रोजी सकाळी दहिवली/सापटणे येथून संध्याकाळी करकंब येथे पोहोचेल. १५ रोजी करकंब / गुरसाळा येथे महाराजांचे भजन होऊन रात्री उशिरा पंढरपुरात वारी पोहोचेल. १६ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजे नंतर महाराष्ट्रातून येणाऱ्या मानाच्या दिंड्या ज्यात प्रामुख्याने संत श्री निवृत्तीनाथ, संत श्री ज्ञानेश्वर माऊली, संत श्री सोपान काका संत मुक्ताबाई, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री नामदेव महाराज, व संत श्री तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांचे स्वागत व मानाचे निमंत्रण देण्याचा मान हा अमळनेरच्या वाडी संस्थांनाच्या गादी पुरुषांना आहे. त्यामुळे महाराज पंढरपूरच्या गाववेशी वर जाऊन या सर्व दिंडीचे मानाचे नारळ देऊन स्वागत करतात व मानाचे निमंत्रण दिल्यानंतर मग सर्व मानाच्या दिंड्या पंढरपुरात दाखल होतात.
वारीत येणाऱ्या भाविकांनी अशी करावी तयारी…
या पायी वारी प्रवासात पिण्याच्या पाण्याची सोय तसेच अंथरून, वाहून नेण्यासाठी मोठ्या वाहनाची व्यवस्था त्याचबरोबर प्राथमिक औषधी उपचारांची देखील सोय संस्थांतर्फे दरवर्षी केलेले असते. पायी वारीला येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी सोबत बॅटरी, लाकडी काठी, पिण्याच्या पाण्याची बाटली, घोंगडी अथवा रेनकोट हे साहित्य सोबत असणे गरजेचे असते.