अध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड…
अमळनेर:- येथील कुणबी पाटील समाज यांची श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्थेची वार्षिक बैठक नुकतीच संपन्न झाली, यात येणाऱ्या पुढील समाजाच्या विकासासाठी व भविष्यासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
समाजातील अडीअडचणी, समाजात होणारे काही मुद्दे सोडवण्यासाठी ही कार्यकारणी काम करणार आहे. नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी शेखर लोटन पाटील (गोविंदा पाटील, चहावाले),उपाध्यक्ष नवल किसन पाटील, सेक्रेटरी अशोक मुरलीधर पाटील,खजिनदार पुरुषोत्तम एकनाथ पाटील आणि कार्यकारिणी सदस्यांमध्ये सखाराम तुकाराम पाटील, दिलीप बाळू पाटील, शिवाजी बापू पाटील, शांताराम विष्णू पाटील, संजय अमृत पाटील, जगन वामन पाटील, ब्रिजलाल युवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचितांचे समस्त कुणबी पाटील समाज बांधवांकडून अभिनंदन करण्यात आले असून आगामी काळात समाजातील अनेक प्रश्न व समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे विविध समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीपर व समाज संघटित करण्यावर भर देण्यात येणार आहे.