लोकवर्गणीतून राबवण्यात आला सामाजिक उपक्रम…
अमळनेर:- तालुक्यातील कलाली लोकवर्गणीतून “बोलक्या भिंती” हा उपक्रम राबविण्यात आला असून या उपक्रमाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
कलाली गांवात लोकवर्गणीतून “बोलक्या भिंती तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या भिंतींचे उदघाटन काल रविवारी अमळनेरचे सुपुत्र दोंडाईचा येथील तहसिलदार सुदामजी महाजन, एसटीआय संदिप पाटील व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर स्पर्धा परीक्षा संबंधी वरील मान्यवरांचे मार्गदर्शन व मनोगत जि.प.उच्च माध्य.शाळेत, अमळनेर तालुका शेतकी संघाचे प्रशासक संचालक मंगलसिंग सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सरपंच सौ. मिनाताई सुर्यवंशी उपसरपंच विजूताई कोळी, सामाजिक कार्यकर्ते चत्रूभुजनाना पाटील, ॲड बाळासाहेब पाटील, अरुण चव्हाण सर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष शेखर पाटील, कलाली उच्च प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ साळुंखे, कलाली दारूबंदी कमिटीचे अध्यक्ष योगराज कोळी, पोलीस पाटील मॅडम,कलाली विकास मंचचे पदाधिकारी व परिसरातील गांवातील शिक्षण प्रेमी नागरीक व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी निंभोरा येथील सरपंच सुनील सर व उपसरपंच आलेशभाऊ धनगर, कृषी अधिकारी सौ.लांडगे मॅडम, प्रा.लांडगे सर, ग्रामसेविका सौ.पवार मॅडम , मंगरूळचे समाधान पारधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देसले सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी घनशाम आबा, मुख्याध्यापक साळुंखे सर ग्रामसेवक पवार मॅडम, जितेंद्र शेटे, विनोद पाटील, कल्पेश सर, प्रमोद पाटील, राहुल बैसाणे, बापू भगत ,सुकदेव भील,विजय वाघ यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन निम हायस्कूलचे अरुण चव्हाण सर यांनी केले.