
पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत झाले सारेच आक्रमक…
अमळनेर:- येथील विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच लढविणार हे आमचे निश्चित असुन काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्याने इतर कोणत्याही पक्षाला जागा सोडण्याची आवश्यकता नाही असा सुर अतिशय आक्रमक होत पक्ष निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या तालुका काँग्रेसच्या बैठकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने काढला. तसेच रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनीही मते मांडली.

अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची सभा दि.28 रोजी धनदाई माता एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये संपन्न झाली. सदर सभा काँग्रेस पक्षात येत्या अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक कोण ? व त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी होती. त्यासाठी निरीक्षक म्हणून प्रदीप देशमुख व देवेंद्र सिंग पाटील (चाळीसगाव) यांची पक्षाकडून निरीक्षक म्हणून खास उपस्थिती होती. शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी सुरवातीला प्रास्ताविकात अमळनेर विधानसभेच्या काँग्रेस उमेदवारांचा वीस वर्षाचा इतिहास कथन करताना अमळनेरची जुनी काँग्रेस पासून तर माजी आमदार कै. अमृत आप्पा पाटील यांच्या पर्यंतचा सर्व इतिहास वाचला. त्यानंतर” सभेत भाषणे नकोत” म्हणून सर्व उपस्थितांतर्फे माजी जि. प. सदस्य शांताराम शामराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी अमळनेर मतदार संघ काँग्रेसला का सोडावा? यासाठी सर्व उपस्थितांची मते घेतली. त्यात सर्वत्र, एकमुखाने अमळनेर विधानसभा काँग्रेसला सोडण्याचे सूतोवाच आक्रमक पद्धतीने केले. त्यानंतर निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी काँग्रेसची आजची परिस्थिती व भाजपने केलेले महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, पक्षफोडी, तसेच जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती अवगत केली. सर्वांचा उत्साह पाहता अमळनेर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षालाच सोडली जाईल असेही त्यांनी आश्वस्थ केले. उपस्थितांना मार्गदर्शन केले. व त्यानंतर बंद खोलीत फक्त इच्छुक उमेदवार व दोन्ही निरीक्षक, यांची बैठक झाली. अमळनेर तालुक्यातील इच्छुकांची नावे व त्यांचे मनोगत जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेसला कळविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे आहेत इच्छुक उमेदवार…
इच्छुक उमेदवार म्हणून जेष्ठ नेत्या सुलोचना वाघ, संदीप घोरपडे, के. डी. पाटील यांची निरीक्षकांसोबत चर्चा झाली. प्रत्येकाने आपापले बायोडेटा, फाईल निरीक्षकांना सुपूर्त केल्या. सदर सभेस तालुका अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी, ओबीसी जिल्हाध्यक्ष डी डी पाटील,जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील,युवक अध्यक्ष ऍड कौस्तुभ पाटील, महिला शहराध्यक्ष प्रा. नयना पाटील, संभाजी पाटील, सुरेश पाटील, राजू फाफोरेकर, आधार बाबुराव पाटील, प्रताप नगराज पाटील, रोहिदास सुखा पाटील, राजेंद्र पाटील, गजेंद्र साळुंखे, प्रेमराज चव्हाण, अमित पवार, प्रकाश पाटील, होलार, कन्हैयालाल कापडे, पार्थ पाटील, रामकृष्ण पाटील, प्रवीण जैन, अलीम मुजावर, शेखा मिस्तरी, त्र्यंबक पाटील, डॉ. रवींद्र पाटील, भास्कर बोरसे, भगवान संधान शिव, भानुदास कांबळे, राजू भट, के.वी पाटील, बन्सीलाल भागवत अजहर आली हर्षल जाधव, शरद पाटील, अशोक पाटील, विठ्ठल पवार, श्रीराम पाटील, श्रीराम पाटील, नरेश राठोड, पी. वाय. पाटील, सहित तेली, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह 250 जणांची उपस्थिती होती. शेवटी आभार तालुकाध्यक्ष बी.के. सूर्यवंशी यांनी मानले.

