
सालाबादाप्रमाणे रामदेवजी बाबा ग्रुपची मिरवणूक ठरली आकर्षक व लक्षवेधी
अमळनेर : वाल्मिकी मेहतर समाज व रामदेवजी बाबा ग्रुपतर्फे हिंदू ,मुस्लिम धर्माच्या ऐक्याचे प्रतिक असलेल्या गोगादेव महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते गोगादेव महाराजांची आरती व पूजा करण्यात आली. सालाबादाप्रमाणे रामदेवजी बाबा ग्रुपची मिरवणूक आकर्षक व लक्षवेधी ठरली.
सुरुवातीला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा रामदेव बाबा ग्रुप तर्फे बुद्धा जाधव, विकी जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी सतकार केला. तसेच मोहन सातपुते , विक्रांत पाटील ,प्रताप शिंपी , प्रशांत निकम , पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत , किरण पाटील ,महेंद्र रामोसे ,पंकज साळी ,भूषण भदाणे , सुनील शिंपी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मिरवणुकीत विविध ठिकाणाहून आलेले पाच बॅन्ड , यवतमाळ येथील दोन ढोल ताशा पथक , अमळनेरचे एक पथक , ट्रॅक्टरवर अमरावती येथून आणलेली ३० फूट हनुमान मूर्ती , कालिका माता मूर्ती , छत्रपती शिवाजी महाराज व श्रीरामाची प्रतिमा ठेवण्यात येऊन विद्युत रोषणाईत झामी चौक ,पवन चौक ,सुभाष चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात विसर्जन करण्यात आले.
गोगा नवमी जयंती साजरी करण्यासाठी व आकर्षक आणि लक्षवेधी मिरवणूकीसाठी वाल्मिकी मेहतर समाज , रामदेवजी बाबा ग्रुप , बुद्धा जाधव , विकी जाधव ,विशाल जाधव ,महेश जाधव ,सनी जाधव ,राजेश दाभोडे , मितेश जाधव ,आकाश जेधे , सुदेश भुरट , निलेश भुरट , सुनील भुरट ,सोनू महाले , राकेश दाभोडे , शक्ती दाभोडे , सागर पचारवाल यांचे सहकार्य लाभले.

