लवकरच होणार नवीन चेअरमन व व्हा.चेअरमन निवड
अमळनेर-येथील अमळनेर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन मोहन सातपुते व व्हा चेअरमन प्रदीप अग्रवाल यांनी आपला वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पदाचा राजीनामा दिला असून संचालक मंडळाने राजीनामा मंजूर केला आहे.
जिल्हा निबंधक यांच्या आदेशानंतर लवकरच नूतन चेअरमन व व्हा.चेअरमन यांची निवड केली जाणार आहे.अमळनेर अर्बन बँकेत 13 संचालकांचे मंडळ असून परंपरेनेनुसार सारेच संचालक एकत्र आहेत.गेल्या वर्षी पाच वर्षांसाठी हे संचालक निवडून आले आहेत.पाच वर्षात पाच जणांना चेअरमन व पाच जणांना व्हा.चेअरमन करण्याचे धोरण या मंडळाने आखले आहे.त्यानुसार गेल्या वर्षी प्रथम वर्षात चेअरमन पदाची संधी जेष्ठ व अनुभवी संचालक मोहन सातपुते यांना तर व्हा चेअरमन पदाची संधी प्रदीप अग्रवाल यांना मिळाली होती.त्यांनी आपला कार्यकाळ उत्तमरित्या सांभाळला.त्यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दोघांनी राजीखुषीने राजीनामा दिल्यानंतर संचालक मंडळाने तो मंजूर करत याबाबतचा अहवाल जिल्हा निबंधक यांच्याकडे पाठविला आहे.नूतन चेअरमन निवडीची तारीख प्राप्त झाल्यानंतर निवड केली जाणार आहे. दरम्यान आता या एक वर्षासाठी चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची संधी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यासाठी संचालक मंडळात अनेक जण इच्छुक आहेत.पार्टी मिटिंग मध्ये याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.