अमळनेर-1 जुलै महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त अमळनेर येथील योगा भवनाच्या परिसरात न प चे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.अमळनेर शहरात सानेगुरुजी शाळेच्या बाजूला पालिकेने दिलेल्या खुल्या भूखंडात भव्य योगा भुवन साकारण्यात आले असून याठिकाणी वृक्षांचे नंदनवन देखील साकारण्यात येणार आहे. विविध जातींची सुमारे 200 झाडे येथे लावण्यात येणार आहे.कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.या उपक्रमाचे मुख्याधिकारी नेरकर यांनी कौतुक करत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.यावेळी माजी नगरसेवक सुभाष अग्रवाल, सानेगुरुजी शाळेचे संचालक भास्कर बोरसे,हिंमतराव पाटील,पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष आर जे पाटील,सचिव जितेंद्र ठाकूर,जेष्ठ पत्रकार संजय पाटील,किरण पाटील,महेंद्र रामोशे,चंद्रकांत काटे,बाबूलाल पाटील,मुन्ना शेख,संदीप पाटील,अमोल पाटील,युवराज पाटील,पांडुरंग पाटील, चंद्रकांत पाटील,महेंद्र पाटील,संभाजी देवरे,कुंदन खैरनार,आबीद शेख,श्यामकांत पाटील,डॉ विलास पाटील,गणेश पाटील,विजय पाटील,वसंतराव पाटील,विक्की जाधव,अनिल पाटील,योगेश महाजन,मिलिंद पाटील ,काशिनाथ चौधरी,गजानन पाटील,महेंद्र पाटिल, हिरालाल पाटील,समाधान मैराळे, योगेश पाने,सुरेश कांबळे,नूर खान,यदुविर पाटील,धर्मवीर पाटील यासह पत्रकार बांधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.