अमळनेर-श्री अंबरिष ऋषी महाराज महाराज टेकडीवरदि 6 जुलै रोजी आयोजित 2 मिनिटात 2,222 वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आज गुरुवार दि 4 रोजी सायंकाळी 6 वाजता बन्सीलाल पॅलेस,अमळनेर येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी अमळनेर तालुक्याचे सुपुत्र तथा टेकडी विकासात महत्वपूर्ण योगदान असणारे आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असताना कार्यक्रमाच्या दिवशी योग्य नियोजन होण्यासाठी आणि समाजातील जास्तीतजास्त घटकांचा या उपक्रमात सहभाग असावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.तरी सदर बैठकीत सर्व सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, विविध मंडळाचे पदाधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी बांधव, महिला मंडळ, विविध कामगार युनियन,नोकरदार वर्ग आणि शेतकरी बांधवानी देखील आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडी ग्रुप, अमळनेर यांनी केले आहे.