प्रत्येक प्रभागात घरोघरी होणार सर्वेक्षण,राष्ट्रीय आरोग्य अभियान व पालिकेचा उपक्रम
अमळनेर- शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान व अमळनेर नगरपरिषद अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने मान्सुन कालावधीत किटकजन्य आजार जसे डेंग्यु, मलेरिआ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले असून पथकातील आरोग्य कर्मचारी प्रत्येक प्रभागात जाऊन घरोघरी सर्वेक्षण करणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन बाहेकर,अमळनेर न.प.चे मुख्याधिकारी तुषार नेरकर, जिल्हा हिवताप अधिकारी तुषार देशमुख,अमळनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ गिरिष गोसावी व न.प. वैदयकीय अधिकारी डॉ विलास महाजन यांचे मार्गदर्शनात आरोग्य सेवकांच्या पथकांव्दारे हे सर्वेक्षण दि.03 जून पासुन सुरु करण्यात आले आहे. सदर आरोग्य पथकांव्दारे शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण तथा तपासणी करण्यात येणार आहे.यात नागरिकांत जनजागृती करणे, दुषीत कंटेनर खाली करणे, पाण्याच्या डबक्यांत क्रूड ऑईल टाकणे, व नागरिकांना आठवडयातुन एक दिवस कोरडा पाळण्याच्या सूचना करणे, परिसर स्वच्छ ठेवणेबाबत जनजागृती करणे आदी कामकाज पथकांव्दारे करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे न.प.स्वच्छता विभागाव्दारे शहरात नियमित किटकनाशक भारीत धुरळणी व फवारणी करण्यात येत आहे.
सदर सर्वेक्षण दि.03 ते 09 जून या कालावधीत पार पडणार असुन त्याकामी एकुण 35 आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथके करण्यात आली असुन त्यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा वर्कर यांची नेमणुक करण्यात आली आहे.त्याव्दारे सदर One Time Activity अभियान अंतर्गत सदर सर्वेक्षण मोहिम शहरात कार्यन्वीत करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सदर आरोग्य पथकांना सहकार्य करावे हि विनंती.नागरिकांनीही काळजी घ्यावी आपल्या शहरात डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रत्येक नागरिक व कुटुंबाने देखील काळजी घेणे आवश्यक असून आपले घर व परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा,आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस अवश्य पाळावा:- तुषार नेरकर, मुख्याधिकारी, न.प.अमळनेर
पथकातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. गावाच्या नागरिकांच्या हितासाठीच हे अभियान असल्याने आपल्या घरी आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे :-डॉ.गिरीश गोसावी, तालुका आरोग्य अधिकारी, अमळनेर
सूचनांचे पालन करा. सदर अभियानांतर्गत आपल्या घरी येणारे पथक ज्या सूचना करतील त्याचे काळजीपूर्वक पालन करावे,कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे डॉ.विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी, न.प.अमळनेर