अमळनेर:- सोमवार १५ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष्याचा वतीने प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत मिळणे बाबत निवेदन देण्यात आले.
१० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ४० तालुके व काही महसूल मंडळामध्ये कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळ घोषित करून सवलती देण्यात आल्या होत्या त्यानुसार शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आली होती. तरी आजपर्यंत प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्याची परीक्षा शुल्क महाविद्यालयाने सांगितलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देखील मिळाली नसून ती परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना तत्काळ परत मिळावी म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मा.प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष – राहुल संतोष बि-हाडे , शहर उपाध्यक्ष – दानिश पठाण , शहरकार्याध्यक्ष – समीर शेख , शहरसचिव – यश हापसे , शहरउपाध्यक्ष – सिद्धार्थ वाघ , तालुकाउपाध्यक्ष – चिन्मय पाटील , तालुकासचिव – रोहित पाटील , तालुकासंघटक – मयुर पाटील , स्वप्नील पाटील , दर्शन पोटले , विवेक पाटील , वाल्मीक पाटील , रूपेश बि-हाडे , ज्ञानेश्वर वानखेडे , प्रणय पाटील , करण मोरे , आकाश साळुंखे , पियुष बहारे , लकी पवार , आकाश बि-हाडे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.