
अमळनेर:- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे शिक्षक पालक संघाची सभा संपन्न झाली.यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात उपाध्यक्षपदी माळी सुखदेव मोतीलाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शाळेच्या आयएमए हॉल येथे १३ रोजी शनिवारी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील हे होते.तर पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष नितीन भदाणे प्रमुख पाहुणे होते.यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक ए.डी.भदाणे,पर्यवेक्षक एस.आर.शिंगाने,सी.एस.सोनजे,शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ,पालक शिक्षक संघाचे सचिव पी.एस.काटकर तसेच मागील वर्षाचे पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पालक शिक्षक संघाची कार्यकारणीची निवड करण्यात आली यात चौधरी अंकिता रघुवीर,सैयद सुलेमान,बोरसे अश्विनी रुपेश, भट चेतन अमृत,जोशी संगीता धनंजय,पवार विनोद रुपला,कासार सुषमा महेश, मुंदाणकर हरिष सुधाकर,पाटील ज्योती प्रकाश, शिरोडे अरुण वामन,डंबेलकर कल्पना प्रकाश,बंजारा लक्ष्मण छगन यांची पालकांमधून निवड करण्यात आली. यावेळी पालकांनी काही मार्गदर्शक सूचना मांडल्या. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांवर यावेळी सखोल चर्चा झाली. यावेळी पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन डी.एम.निघोट यांनी केले.आभार आर.एस.मंगसुळे यांनी मानले.

