अमळनेर:- तिरंगा चौक ते प्रांत कार्यालय असा टोकरे कोळी समाजाचा जात प्रमाणपत्र मागणीसाठी बिऱ्हाड मोर्चा १५ रोजी काढण्यात आला. यावेळी यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देण्यात आले.त्यात अमळनेर प्रांत कार्यालयामार्फत कोळी लोकांना टोकरे कोळी (एसटी) चे दाखले जातप्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. तद्नंतरही चोपडा व अनेर भागातील आदिवासी कोळी लोकांनी आपल्या कार्यालयाकडे टोकरेकोळी (अनु.जमाती) चे दाखले जातप्रमाणपत्र मिळणेसाठी सेतु सुविधा केंद्रांमार्फत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्या अर्जांचीआपल्या कार्यालयामार्फत दोन वेळेस तपासणी व सुनावणी झालेली आहे. त्यांची एक झेरॉक्स प्रत आपल्या दप्तरीजमा केलेली आहे. त्या प्रकरणांना सबळ पुरावेही जोडण्यात आलेले आहेत. अशा सर्वच प्रलंबित व नवीन ऑनलाईन दाखल होणाऱ्या अर्जांचा निकाल होऊन त्या सर्व अर्जदारांना टोकरेकोळी (एसटी) चेदाखले जातप्रमाणपत्र मिळाले पाहिजेत.यासाठी जगन्नाथ बाविस्कर, सुखदेव सोनवणे शांताराम कोळी, हिलाल सैंदाणे, रामचंद्र सपकाळे, गोपाल देवराज भिमराव कोळी यांच्यासह चोपडा, अमळनेर परिसरातील बांधव उपस्थित असून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.