प्रतिपंढरपूर वाडी संस्थानला आनंददायी भेट, अमळनेर परिसराच्या समृद्धीसाठी घातले विठुरायाला साकडे…
अमळनेर: आषाढी एकादशी निमित्त 15 जुलै रोजी न्यू व्हिजन इंग्लिश मीडीयम स्कूल ने वारी चे आयोजन केले. या वारीच्या निमित्ताने आजच्या नव्या पिढीला महाराष्ट्रातील संत परंपरा,महाराष्ट्र व जवळपास च्या राज्यातील लोकांच्या मनात व आचरणात असलेली वारकऱ्यांची जीवन शैली व विठ्ठला प्रति असलेली आस्था अनुभवता येईल हा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी ही आपल्या जीवनात सदविचारांची पेरणी करावी व सत्वशील जीवन जगावं ही शिकवण देण्याचा न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलचा एक छोटा-सा कृतिशील उपक्रम असतो.यावेळी विठ्ठलाच्या भूमिकेत सम्राट भोई, रुक्मिणीच्या भूमिकेत गुंजन कासार व सखाराम महाराज यांच्या भूमिकेत यज्ञेश लांडगे हे विद्यार्थी होते. दिंडी व पालखी कार्यक्रमाची सांगता विद्यालयाच्या प्रांगणात भक्तीभावात नाचून झाली. या वेळी साई पापड उद्योग चे संचालक रवींद्र चौधरी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी पूजन करण्यात आले. यावेळी पंढरीनाथ महाराज, अध्यक्ष शितल देशमुख सर, चेअरमन निलेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रित नाचून आनंद व्यक्त केला.
ही दिंडी न्यू व्हिजन स्कूल पासून पायी चालत तिरंगा चौक, सराफ बाजार, वाढीचौकवरुन बोरी नदीच्या काठावर वसलेले प्रति पंढरपूर अर्थात संत सखाराम महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिरा पर्यंत पोहचली. त्या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व सर्व शिक्षकांनी ठेका धरत रिंगणाचे विलोभनीय प्रदर्शन केले. हरि नामाचा अखंड गजरात अवघी *प्रति पंढरी* दुमदुमून गेली. यावेळी उदय देशपांडे, संजू भांडारकर, गणेश महाजन व जोशी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सखाराम महाराज मंदिरात स्वागत करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. या अनोख्या सोहळ्याचे शहर वाशियांनी तोंडभरून कौतुक केले व लहान-लहान मुलांच्या आगळ्या वेगळ्या नाच गाण्यांचा आनंद ही अनुभवला.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिंडीच्या आयोजनाची संकल्पना सर्व प्रथम ज्यांच्या कल्पनेतून साकार झाली असे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शितल देशमुख, चेअरमन निलेश लांडगे, प्राचार्या प्रेरणा पाटील यांच्या मार्गदर्शनाने संत सखाराम महाराज यांची पालखी व दिंडी चे यशस्वी आयोजन पार पडले.
या आयोजना साठी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद सुमित्रा झाँजोटे, दिपाली राजपूत, श्री.के. पी. बागुल,वैभव आढाव,सिद्धार्थ शिरसाठ,भाग्यश्री अमोदेकर, सॅम सर, विद्या पाटील,अमोल पाटील, वंदना मराठे, दिपाली पाटील,अनिता पाटील,श्रद्धा भंडारी, कामिनी महाजन, किरण पारीक, भौतिकी पटवर्धन,नेहा जाधव,मयूर पाटील, योगिता पाटील, कल्याणी यादव तसेच शिक्षकेतर कर्मचारी वंदना सोनार, प्रतिभा पाटील, माधुरी बाळापुरे, मीना पाटील यांनी मेहनत घेतली.