अमळनेर:- तालुक्यातील गांधली पिळोदे येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी रात्री जनावरांवर हल्ले सुरू केले असून पाच बकऱ्या ठार झाल्या आहेत. वेळीच बंदोबस्त न झाल्यास मनोहर पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मनोहर पाटील यांनी सांगितले की, गेल्या महिन्याभरापासून गांधली पिळोदे या दोन्ही गावात रात्री दोन कुत्रे अचानक जनावरांवर हल्ले करतात. संगीताबाई कैलास बाविस्कर यांच्या सात पैकी पाच बकऱ्या ठार केल्या असून उर्वरित दोन्ही बकऱ्या अत्यवस्थ आहेत. संतोष श्रावण कोळी यांच्या दोन बकऱ्या, सुकलाल भिल यांचे दोन बोकड एक बकरी , हेमकांत सुभाष पाटील यांचा गोर्हा, एक वासरू विठ्ठल सीताराम वडर यांच्या चार डुकरांवर कुत्र्यांनी हल्ला केला. तर पिळोदे येथे तुळशीराम बांगर पाटील यांचे एक पारडू , बळीराम रतन कोळी यांच्या एका बकरीवर कुत्र्यांनी हल्ला केला. दोन्ही गावाच्या ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास माजी सरपंच मनोहर पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.