अमळनेर:- स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थी पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पिनाकी बानीक सर होते. या पदग्रहण सोहळ्यात निवड झालेल्या हेड बॉय, हेड गर्ल, कॉर्डिनेटर्स, कॅप्टन्स व व्हाईस कॅप्टन यांना सन्मानित करण्यात आले. ह्या वर्षासाठी चि. भावेश चावरिया यास हेड बॉय व कुमारी सिद्धी पाटील हीस हेडगर्ल म्हणून निवडण्यात आले. तसेच पार्थ पाटील याची प्रिफेक्ट हेड म्हणून नेमणूक झाली. सर्व विद्यार्थ्यांना बॅजेस व सेचेस देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात पृथ्वी, अग्नी, आकाश व सूर्य या चारही हाऊस मधील शिक्षक प्रतिनिधी यांनाही सन्मानित करण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य विनोद अमृतकर यांच्यासोबत शपथ ग्रहण केली. कार्यक्रमास शाळेचे संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, सितिका अग्रवाल, चेअरमन डी डी पाटील, व्यवस्थापन सदस्या ममता अग्रवाल, आंचल अग्रवाल मॅडम उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्राचार्य विनोद अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.