अमळनेर:- शहरातील वॉर्ड क्रमांक पाच मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा, तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी वगळण्यात आलेल्या मतदारांची पूनर्नोदनी व नव्यानेच मतदार झालेल्यांची मतदार नोंदणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व युवक जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या आदेशाने अमळनेर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सैय्यद अजहर अली यांच्या वतीने वार्ड क्र.5 (जापान जीन)मध्ये मोफत नोंदणी शुभारंभ अमळनेर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा.नयना कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नोंदणी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी जयेश सोमवंशी, भाग्यश्री वानखेड़े , अफ़ज़ल शेख, रेयान पठान, अबराब खान, आर्यन सिकलीगर व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारसंघातील सर्व माता भगिनींनी या मोफत नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख उपस्थिती देत अमळनेर महिला काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षा प्रा. नयना कैलास पाटील यांनी केले.