अमळनेर:- येथील मुंदडा नगर एक जवळील कस्तुराबाग नगर मध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. नगरपालिकेत वारंवार तक्रार करूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील नागरिक व महिला येथील पाण्याच्या टाकीवर एकत्र आले होते.
सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस आहेत. घरात साठवलेला पाणी साठा जास्त दिवस झाल्याने मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिकेत याबाबत तक्रार केल्यावर उडवा उडविचे उत्तर दिले जाते.गेल्या दीड महिन्यापासून पाण्याची समस्या असून नगरपालिकेत जबाबदार अधिकारी यांना सांगूनही समस्या सुटत नसेल तर येथील संतप्त महिला हंडा मोर्चा घेऊन येणार असल्याचे सांगितले आहे.