
अमळनेर – शहरात मिळून आलेल्या एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान धुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने अमळनेर पोलिसांनी त्याचा धुळे येथे अंत्यविधी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की अंदाजे 40 ते 45 वर्ष वयाचा एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला धुळे येथे रवाना करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अमळनेर पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करत त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन धुळे येथेच त्याचा अंत्यविधी केला. यासाठी पो.हे.कॉ.अशोक साळुंखे यांनी कामकाज पाहिले असून पुढील तपास ते करत आहेत.

