अमळनेर-मा.उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयानंतर तथा सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या शासन निर्णयानंतर अमळनेर नगर परिषदेत लाड व पागे समितीच्या वसुली वारसा पद्धतीनुसार प्रथमच 8 वारसांना नेमणुका देण्यात आल्या.
खंडपिठातील दिवाणी रिट याचिकेत गोपाल मकूलाल बिऱ्हाडे व इतर विरुद्ध कैलास मारोती राजकोर या केस मध्ये जस्टीस घुगे व जस्टीस खोब्रागडे यांच्या खंडपीठाने प्रदीर्घ अभ्यास करून 1975 पासून सुरू असलेला शासन स्वीकृत लाड पागे समितीच्या निर्णयानुसार मागासवर्गीय शेड्युल कास्ट च्या सफाई कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या वारसा पद्धतीने नेमणुकांच्या बाबत स्थगिती आदेश उठऊन मागासवर्गीय 59 जातींपैकी 56 जातींना न्याय देत त्यांचा लाड व पागे समितीच्या शिफारिशनुसार नेमणूक देण्याचा मार्ग मोकळा केलेला होता.
सदरच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडील दि. 12 जुलै 2024 राज्यातील अनुसूचित व जाती नवबौद्धंसह सफाई कामगारांच्या वारसांना नेमणुका देण्याचे आदेशित केल्याने अमळनेर पालिकेत देखील दि. 25 रोजी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी 8 सफाई कामगार च्या रिक्त असलेल्या सफाई कामगार या पदावर सफाई कामगारांच्या वारसास नेमणुका दिल्यात.यानिमित्ताने तुषार नेरकर यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे सह माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सोमचंद संदानशिव, ज्ञानेश्वर संदानशिव, गोपाल बिऱ्हाडे, गोल्डी बिऱ्हाडे, गोपाल गजरे, मेजर विनोद बिऱ्हाडे, राजेंद्र संदानशिव, अविनाश संदानशिव,भरत सोनवणे यांचेसह मोठ्या संख्येने सफाई कामगार उपस्थित होते.