अमळनेर : छतावरचा कचरा माझ्या छतावर का टाकला याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तिघांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता बंगाली फाईल भागात घडली.
भाऊराव मधुकर शेजवळ हा ५ जून रोजी घरचे पत्रे बदलवत असताना शेजारील सुरेश सुकलाल चौधरी हा झाडू घेऊन छतावर आला व त्याने कचरा शेजवळ च्या छतावर टाकला. त्याचा जाब विचारला असता सुरेश चौधरी ,मनीषा सुरेश चौधरी , जयेश सुरेश चौधरी याना राग आल्याने जातीवाचक शिवीगाळ केली. तुला मारण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी देईल असे सांगत शिवीगाळ केली. तिघांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.