अमळनेर शहरातील ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि खान्देश रक्षक फाउंडेशन अमळनेर यांच्यातर्फे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.यानिमित्ताने शहरात १०५ फुटाचा भव्य तिरंगा रॅली येथून रॅली काढून देशभक्तीचे वातावरण तयार करण्यात आले.
या रॅलीची सुरवात छत्रपती शिवाजी पुतळ्यास ४९ एन. सी. सी. चे कंमाडींग ऑफीसर पिनाकी बनिक यांच्या हस्ते माल्यार्पण करून देश भक्तीच्या घोषणा देत रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून स्टेशन रोड सुभाष चौक येथे थोर सेनानी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ही मिरवणूक दगडी दरवाजा मार्गे तिरंगा चौकात अमर जवान स्मारकावर कारगिल युद्धात शहीद जवानांना कमांडीग ऑफीसर पिनाकी बनिक व खान्देश रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सुर्यवंशी व उपस्थित जवानांच्या हस्ते पुष्पांजली वाहुन सामुहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. त्यांनतर रॅली परतीच्या मार्गाने बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी नाट्यगृह या ठिकाणी समारोप करण्यात आला.या रॅलीत एनसीसी कडेट, जी एस हायस्कूल, प्रताप काॅलेज , एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कुल, मुंंदडा ग्लोबल व्हीव स्कुल, साने गुरजी शाळा, एनसीसी विद्यार्थ्यांच्या सोबत शिक्षक वृंद व एनसीसी चे सुबेदार सतीष कुमार तिवारी, बीएचएम विरेन्द्र, हवलदार प्रविण म्हसदे, सुनिल सोनार यांनी उपस्थित तसेच खान्देश रक्षक फाउंडेशन चे अध्यक्ष विजय सूर्यवंशी, धनराज पाटील, विलास महाले रामकृष्ण पाटील, शशिकांत वाघ, ईश्वर चौधरी, प्रवीण पाटील, विनोद पाटील, बोदरे,शांताराम पाटील, सुधीर पाटील,स्वप्नील शिरसाट, सचिन पाटील,भूषण डी. पाटील यांंच्या सह आजी माजी सैनिक उपस्थित होते. शेवटी विजय सुर्यवंशी यांनी कारगिल विजय या तिरंगा परेड मध्ये उपस्थित सर्व रक्षकांचे खूप खूप आभार व्यक्त केले.