न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचा पर्यावरणपूरक उपक्रम…
अमळनेर -यंदाच्या पावसाळ्यात अमळनेर तालुक्यात कडुलिंबाचे नंदनवन सकारण्यासाठी एक लक्ष सिडबॉल विविध परिसरात रोवण्याचा संकल्प न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुलने केला असून याचा शुभारंभ तालुक्यातील जानवे डांगर वनक्षेत्रात २० हजार सिडबॉल रोवून करण्यात आला.
न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष शितल देशमुख यांच्या संकल्पनेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहे.स्कुलचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांनी हे कडू लिंबाचे सिडबॉल तयार केले आहेत.पावसाळ्यात हे सिडबॉल जमिनीत रोवल्यास खराब न होता 90 टक्के जगण्याची शास्वती असते.सदर सिडबॉल जानवे-डांगर फॉरेस्ट जुनोने व तालुका परिसर येथे नेण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या हस्तेच विविध ठिकाणी रोवण्यात आले.यावेळी स्कुलचे अध्यक्ष शितल देशमुख, उपाध्यक्ष धनराज महाजन, चेअरमन निलेश लांडगे सर ,सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघ,प्राचार्या सौ प्रेरणा पाटील व शिक्षक व शिक्षिका सौ सुमित्रा झांजोटे, वैभव आढाव,दिपाली राजपूत, विद्या पाटील, सॅम सर व के. पी.बागुल सर सिद्धार्थ शिरसाट सर व विद्यार्थी उपस्थित होते. टप्प्याटप्प्याने हे सिडबॉल तयार झाल्यानंतर तालुक्यातील विविध भागात रोवण्यात येणार असल्याचे श्री देशमुख यांनी सांगितले.