अमळनेर:- अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररी तर्फे विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा गांधलीपुरा येथील लायब्ररीच्या कार्यालयात संपन्न झाला.
सत्कार मूर्ति अर्बन बँक चेअरमन पंकज मूंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे , बिल्डर प्रशांत निकम यांचा भव्य सत्कार यावेळी अध्यक्ष रियाज़ शेख यांचेसह कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, प्रा.डॉ.लिलाधर पाटील, बन्सीलाल भागवत, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील, नगरसेवक श्याम पाटील, डॉ.श्यामकांत नेरकर, सोमचंद संदानशिव, हाजी ताहेर शेख, गोपाल बिऱ्हाड़े, यूसुफ पेंटर, अज़ीम शोला, जहूर मुतवल्ली, पन्नालाल मावळे, संतोष लोहरे, नीतीश लोहरे,हाजी दबीर पठान,गयास अहलेकर, रूकानोद्दिन अहलेकर, आबिद भाई सिंगर, अख्तर भाई आदींच्या हस्ते करण्यात आला.
अर्बन बँकेच्या तर्फे कष्टकरी सभासदांसाठी आर्थिक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संचालक मंडळामार्फत प्रयत्न करू असे याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना बँकेचे चेअरमन पंकज मूंदडे, व्हा. चेअरमन रणजित शिंदे यांनी सांगितले. तर प्रशांत निकम यांनी चांगल्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे म्हणून राजकीय दृष्ट्या सक्रिय होत असल्याचे सांगितले.रियाज शेख यांनी सामाजिक सद्भाव जोपासत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे अशी प्रस्तावना यावेळी केली. अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व जाती धर्माच्या दृष्टीने सामाजिक सलोखा जपत काम करणाऱ्यांना आपले प्रतिनिधी म्हणून समाजाने संधी देणे आवश्यक आहे असे सांगितले. याप्रसंगी सोमाचंद संदानशिव, बन्सीलाल भागवत, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील,प्रा.डॉ.लिलाधर पाटील, आदींनी उपस्थितांना संबोधित केले.सूत्रसंचालन अ. रज्जाक शेख यांनी केले .
याप्रसंगी पत्रकार अजय भामरे, सोपान भवरे, आपा पारधी, पिंटू पारधी,बल्ली पवार, अ. रहेमान मिस्त्री, अलीम बाबू तासे वाले, निसार भाई अडावद, शाकीर भाई, अलीम मुजावर, जमील मुज़ावर,जाकिर भाई रद्दी वाले,युनुस ठेकेदार, जलाल पी ओ पी, अ.खालिक भाई, ऐजाज शेख, अहमद अली,फारुक खटीक,रहीम मलिक,राम कृष्ण सर,रफीक भाई, सबीर पठान, अमन शेख, यूसुफ शेख,आकिब भाई आदि उपस्थित होते.