अमळनेर:- शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत 22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताह अंतर्गत शनिवारी शाळेत इको क्लब स्थापन करण्यात आला व अ प्लँट फॉर मदर अभियानांतर्गत शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील ,मुख्याध्यापक संजीव पाटील उपस्थित होते, यावेळी पहिली ते सातवी पर्यंतच्या 35 वर्गाच्या विद्यार्थ्यांनी वड,निम,आंबा यासह इतर रोपांची लागवड केली. शिक्षण सप्ताह अंतर्गत सांस्कृतिक दिवस देखील साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला तर क्रीडा दिवसाच्या निमित्ताने पारंपरिक भारतीय खेळाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली व ते खेळ घेण्यात आले अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, आणि मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता दिवस साजरा करण्यात आला,शिक्षण सप्ताहात विद्यार्थ्यांना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून आले