अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथील पडावद फाटा येथे महसुलच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे वाहन पकडुन मारवड पोलिसांत जमा केले आहे.
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तसेच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर तांदळी येथील पांझरा नदी पात्रात आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर ट्रॅक्टर मुद्देमालासह मारवड पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. पथकात तलाठी जितेंद्र जोगी, आशिष पारधे, जितेंद्र पाटील यांचा समावेश होता.