संततधार पावसामुळे आली आपत्ती,दुर्घटना टळली
अमळनेर-गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात संततधार पाऊस सुरू असताना स्टेशन रोडवर एका अपंग व निवृत्त मिल कामगार असलेल्या जेष्ठ नागरिकांचे घर कोसळल्याने मोठे संकट त्यांच्यावर आले आहे.
सुदैवाने वेळीच ही घटना त्यांच्या निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.स्टेशन रोडवर निवृत्त कामगार रमाकांत नामदेव शिंदे यांचे रस्त्यालगत घर असून दि 4 रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या मागच्या घराचा स्लॅब कोळसून घर जमीनदोस्त झाले यात घरातील सामान देखील दाबले जाऊन खराब झाले,त्यांच्या घरात त्यांचा मुलगा व सून आणि लहान मुलेही राहतात सुदैवाने घटनेच्या वेळी त्या घरात कुणीही नसल्याने कोणताही अनर्थ घडला आहे.शेजारील लोकांनी तातडीने मदतकार्य केले.
सदर घटनेची माहिती माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी महसूल प्रशासनास पंचनामा करण्याच्या सूचना केल्याने सकाळी घटनेचा पंचनामा करण्यात आला.या घटनेत या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना शासनाकडून तातडीने अर्थिक मदत मिळावी अशी मागणी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे.