उपचारासाठी धुळे नेताना वाटेत मृत्यू, मारवड येथील घटना…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ७५ वर्षीय वृद्धाने पोटाच्या दुर्धर आजाराला कंटाळून 14 रोजी दुपारी घरात एकटे असताना स्वतः ब्लेडने पोटावर वार करून गंभीर जखमी करून घेतले ही बाब दुपारी 4 वाजता कुटुंबीय घरी आल्यावर निदर्शनास आली, त्यांना गंभीर अवस्थेत धुळे नेतांना त्याचा मृत्यू झाला, धर्मा वामन नेरकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे
मयत धर्मा नेरकर हेच वृद्ध पोटाच्या दुर्धर आजाराने बेजार झालेले होते त्यातून कंटाळून त्यांनी दुपारी 2 वाजता गल्लीत खेळणारे लहान मुलांकडून दुकानातून नवे ब्लेड मागवून घेतले व घरात कुणीच नसतांना स्वतःच्या हाताने पोटावर ब्लेड मारून घेतल्याने त्यांच्या पोटातील आतड्या बाहेर आलेल्या होत्या. ही बाब कुटुंबीय शेतातून घरी आल्यावर लक्षात येताच शेजारच्याच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यावर प्रथमोपचार करून अंमळनेर ग्रामीण रुग्णालय हळविण्यात आले मात्र रुग्णाची गंभीर व चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी त्यास धुळे जिल्हा रुग्णालय नेण्यासाठी सांगितले, ऍम्ब्युलन्सने धुळे येथे नेतांना फागणे जवळच त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर आज गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, याबाबत मयताचा नातू योगेश रवींद्र नेरकर यांच्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार सुनील तेली करीत आहे