अमळनेर:- तालुक्यातील चौबारी येथून बेपत्ता झालेल्या २४ वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला असून याप्रकरणी तिच्या भावाने पोलिसांत खबर दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत २४ वर्षीय रिनाबाई बिरबल पाडवी (रा. राजपुरा, ता. पानसेमल जि. बडवाणी, म.प्र.) ही कामानिमित्त अमळनेर तालुक्यातील चौबारी येथे कुटुंबासह वास्तव्यास होती. दिनांक १२ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या घरून कोणालाही न सांगता निघून गेली. त्यावरून मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. मात्र १४ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास रीनाबाईचा मृतदेह ते राहत असलेल्या शेतातील विहिरीत तरंगताना दिसून आला. सदर मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात येवून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.
Related Stories
December 22, 2024