पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील धार शिवारातील पोलवरून अज्ञात चोरट्याने १६०० मीटर विजेची तार चोरून नेल्याची तक्रार मारवड पोलिसांत देण्यात आली आहे.
सहा. अभियंता प्रफुल्ल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धार येथील राजेंद्र माधवराव पाटील यांच्या शेतातील २८ हजार रुपये किमतीची अल्युमिनियमची १६०० मीटर लांबीची विजेची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे ११ ऑगस्ट रोजी उघडकीस आले आहे. त्यावरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे.कॉ. मुकेश साळुंखे करीत आहेत.