अमळनेर:- शहरातील डी डी नगर भागातील एका व्यावसायिकाच्या बांधकामाच्या साईटवर पाण्याच्या मोटरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.१४ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सदर बालक मजूर म्हणून काम करत असल्याची चर्चा होती.
जगदीश डॉक्टर सेनानी (वय ६ वर्ष ) रा.मंडवाळी, बडवाणी,मध्यप्रदेश हा कुटुंबासह धुळे रोड परिसरात असणाऱ्या डी डी नगर भागात सुरू असलेल्या अभय गोहिल नामक ठेकेदाराच्या रो हाऊसच्या बांधकाम साईटवर मजुरी करण्यासाठी आलेला होता.दि.१४ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरांना पाणी मारण्यासाठी सुरू असलेल्या पाणी मोटारला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला.त्याच्या पालकांनी त्याला लागलीच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत. सदर ठेकेदाराच्या बेपर्वाईमुळे निष्पाप बालकाचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच पोलिसांनी निष्पक्षपणे सदर घटनेचा तपास करावा अशी मागणी होत आहे.
Related Stories
December 22, 2024