मंत्री अनिल पाटील व तहसीलदारांनी केला दोनवेळा स्वतंत्रपणे शुभारंभ…
अमळनेर:- गौरी गणपती सणानिमित्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अमळनेर तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य योजनेतील एकुण ४८९३१ कार्डधारकांना १००/- रु. मध्ये आनंदाचा शिधा (रवा, चनाडाळ, साखर, खाद्यतेल) वाटप करण्यात येणार आहे..
सदर योजनेच्या किट वाटपाचा शुभारंभ दिनांक ११ सप्टेंबर रोजी ना. अनिल भाईदास पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांचे हस्ते शासकिय धान्य गोदामातून वाहतुकीची खेप रास्त भाव दुकानदारांकडे रवाना करण्यात आली आहे. या प्रसंगी पुरवठा निरिक्षण अधिकारी संतोष बावणे, गोदाम व्यवस्थापक अनिल पाटील, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रविण गोसावी, एस. टी. कामगार नेते एल. टी. पाटील, सुदंरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील, इतर रेशन दुकानदार पदाधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थितीत होते.
सदर किट कार्डधारकांना पॉस मशीनव्दारा १०० /- रू प्रमाणे उपलब्ध होणार आहे. तरी सर्व कार्ड धारकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अमळनेर व तहसिलदार यांनी केले आहे.
मंत्र्यांच्या आधीच तहसीलदारांनी केला शुभारंभ, समन्वयाचा अभाव उघड…
शासनाने गणेशोत्सवात आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या शिधा वाटपाचे आधी तहसीलदार आणि नंतर मंत्री अनिल पाटील यांनी वेगवेगळ्या दोन वेळा उदघाटन केले. मंत्र्यांना डावलून तहसीलदारांकडून आधीच शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनात किती समन्वय आहे हे उघड झाले असून मंत्र्यांची प्रशासनावरची पकड ढिली झाल्याचे बोलले जात आहे. याचा जाब आता मंत्री अनिल पाटील तहसीलदारांना विचारतील काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.