अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दि. 10 मार्च ते 16 मार्च 2022 पर्यंत दत्तक गाव मौजे. बोरगाव ता. अमळनेर येथे, “सात दिवसीय विशेष हिवाळी निवासी श्रमसंस्कार शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिराचे उद्घाटन मा. प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबिर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून, जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष आणि ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड चे अध्यक्ष मा. आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील, संस्थेचे सचिव देविदास बारकू पाटील, संचालक महारु रामदास शिसोदे, लोटन शिवदास पाटील, विश्वासराव विनायकराव पाटील, राजेंद्र फकिरा पाटील, चंद्रकांत रामराव शिसोदे, साहेबराव नारायण पाटील, प्रेसिडेंट, शेतकीसंघ अनिल शिसोदे, उपसरपंच प्रवीण पाटील, तसेच गावातील मान्यवरांमध्ये मधू आबा, बाळासाहेब साळुंखे, किसन शिंदे, शांताराम पाटील, हरीभाऊ मारवडकर, निंबा पाटील, संजय पाटील, ठाणे अंमलदार, मारवड पोलीस स्टेशन, अशा प्रतिष्ठित मान्यवरांसोबतच ग्रामपंचायत सदस्य व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते. सदर निवासी शिबिराचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले सर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यापीठाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरासाठी पुरस्कृत केलेल्या विहीत कार्यक्रमाचा आराखडा मांडला. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी निवासी शिबिरार्थी स्वयंसेवकांना शुभेच्छा देवून बहुमोल मार्गदर्शन केले. त्यात प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियान, तरुणांनी विविध व्यसनांपासून दूर राहून स्वतःचा सर्वांगीण विकास साध्य करावा. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा व विविध कौशल्य शिकून स्वयंम रोजगार निर्मिती करावी. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या सोबतच इतरांनाही रोजगार कसा प्राप्त होईल याबाबत भविष्यात कार्य करण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने बहुमोल सहकार्य केले.