अमळनेर : भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार बंशीलाल गुर्जर यांनी शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी श्री मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जळगावच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ, जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणूकप्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) ज्ञानेश्वर पाटील-जळकेकर, अमळनेर शहराध्यक्ष विजय राजपूत, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, सरचिटणीस महेंद्र पाटील, राकेश पाटील, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष देवा लांडगे, जिल्हा सहसचिव समाधान पाटील, मीडिया अध्यक्ष राहुल चौधरी, अमळनेर विधानसभा क्षेत्र विस्तारक रावसाहेब पाटील, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. गुर्जर यांनी श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेऊन मंदिर परिसरातील विविध मंदिरांना भेट देऊन श्री मंगळग्रह मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेतली. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर यांनी श्री. गुर्जर यांचे यथोचित स्वागत केले. तसेच मंगळग्रह सेवा संस्थेच्या कार्याची माहिती विशद केली.
याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, जितेंद्र पाटील, कार्यालय अधीक्षक भरत पाटील यांच्यासह मंगल सेवेकरी उपस्थित होते.