
अमळनेर:- पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर व इतर नोकर वर्गाची सहकारी पतसंस्थेच्या खजिनदार पदी साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि संचालक संजीव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली,सुशील भदाणे यांची पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवड करण्यात आली शुक्रवारी सायंकाळी पतसंस्थेत संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अध्यक्ष सुशील भदाणे,उपाध्याय महेश नेरपगारे,माजी अध्यक्ष रमेश चव्हाण,मंदाकिनी भामरे,सविता बोरसे,तज्ञ संचालक संजय पाटील उपस्थित होते
खजिनदार संजीव पाटील यांचे अध्यक्ष व संचालक आणि सहकार पॅनल प्रमुख तुषार बोरसे, आर व्ही पाटील,जितू ठाकूर,महेंद्र रामोशे,बी बी चव्हाण,जे डी अहिरे यांनी अभिनंदन केले

