
अमळनेर:- घराची फरशी पुसायची आहे असं सांगून एका मागासवर्गीय महिलेला घरी बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना २९ रोजी दुपारी ३ वाजता घडली.
शहरातील एका मागासवर्गीय महिलेला संजय बोरसे (पूर्ण नाव माहीत नाही) याने फोन करून घरची फरशी पुसण्यासाठी फोन केला. महिला घरात काम करीत असताना त्याने तिचा विनयभंग केला. महिला घाबरून गेल्याने त्यादिवशी तक्रार केली नाही असे तिने फिर्यादीत म्हटले आहे. काल महिलेने तक्रार केल्यावरून संजय बोरसे यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायदा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.

